दुर्घटनेत बायकोचा हात निकामी झाला, नाराज नवऱ्याने जे केलं त्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही

बायकोचा हात एका दुर्घटनेत निकामी झाल्याने तिचा नवरा भयंकर नाराज झाला. यानंतर त्याने जे काही केलं त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पोलिसांनी या प्रकरणी नवऱ्यासह एकूण 5 जणांना अटक केली आहे. बिहारमधील मुंगेरची रहिवासी असलेल्या दिपीका शर्मा हिच्या हाताला गोळी लागल्याने तिचा हात निकामी झाला होता. यामुळे तिचा पती रवीकुमार हा नाराज झाला होता. रवीकुमार हा CISF मध्ये कामाला आहे.

पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या 36 तासात उलगडा केला. पोलिसांनी पहिले रवीकुमारचा भाई छोटू शर्मा, वडील राजीव कुमार, चुलत भाऊ सुमित कुमार यांना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये गौतम कुमार आणि संजीव कुमार या गुंडांची नावे समोर आली होती. यातील संजीव कुमार उर्फ पतलू हा पळून गेल्याने पोलिसांच्या हाती लागला नाहीये, उरलेल्या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दिपीकाचा रवीकुमार यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

गौतम कुमार याच्या चौकशीदरम्यान पोलिसांना कळालं की सुमित कुमार याने जवळपास 1 महिन्यापूर्वी गौतमला फोन केला होता. त्याने गौतमला सांगितलं होतं की त्याचा भाऊ रवीकुमार याला त्याच्या बायकोची हत्या करायची आहे. गौतम कुमारने ही सुपारी घेत असल्याचं सुमितला सांगितलं यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचा सौदा निश्चित झाला होता. गौतमला 20 हजारांचा अॅडव्हान्सही देण्यात आला होता.

मुंगेरचे पोलीस अधीक्षक जगुनाथन जलारेड्डी यांनी सांगितलं की 2017 साली दिपीका तिच्या माहेरी गेली होती. दीपिका त्यावेळी 7 महिन्यांची गर्भवती होती. ती माहेरी असताना गोळीबार झाला होता, गोळीबारात दिपीकाच्या आईचा मृत्यू झाला होता तर दिपीकाला 2 गोळ्या लागल्या होत्या. यातील एक गोळी तिच्या उजव्या हाताला लागली होती. गोळी लागल्याने तिचा हा हात निकामी झाला होता. हात निकामी झाल्याने दिपीकाच्या सासरच्या मंडळींना ती आवडेनाशी झाली होती.

रवी कुमार आणि त्याच्या घरच्यांना दिपीकामुळे लाज वाटायला लागली होती. यामुळे त्यांनी तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी दिपीका टॉयलेटला जात असताना गौतम कुमार आणि संजीव कुमार हे घराच्या कुंपणावरून उड्या मारत आत आले आणि त्यांनी दिपीकावर गोळीबार केला. या गोळीबारात दिपीकाचा जागीच मृत्यू झाला.