दीपिका साकारणार माफिया क्वीन ‘सपना दीदी’

43

सामना ऑनलाईन । मुंबई

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर चित्रपट येऊ घातला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारत असलेल्या ‘हसीना पारकर’नंतर आता बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणही एका माफिया क्वीनच्या भूमिकेत दिसणार आहे. कुख्यात माफिया असलेल्या अशरफा खान उर्फ सपना दीदी हिच्यावर बेतलेल्या चित्रपटात सपना दीदीची भूमिका दीपिका साकारणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका सध्या पद्मावतीच्या चित्रीकरणात व्यस्त असून पद्मावतीचं चित्रीकरण साधारण ऑक्टोबर दरम्यान संपण्याची शक्यता आहे. पद्मावतीसारखा भव्य ऐतिहासिक चित्रपट केल्यानंतर दीपिकाला कामातून जरासा ब्रेक घ्यायचा असून त्यानंतर जानेवारी २०१८ पासून ती सपना दीदीवरच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. पद्मावतीखेरीज दीपिका हॉलिवूडच्या ट्रिपल एक्सच्या चौथ्या भागातही दिसणार असल्याचं या चित्रपटाचे दिग्दर्शक डी.जे. कार्सो यांनी जाहीर केलं आहे.

haseena-parkar-sapana-didi

काही महिन्यांपूर्वीच सपना दीदीवरच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी दीपिका हीच या भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्री असल्याचं मत प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी व्यक्त केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या