अहमदपूर परिसरात हरणांच्या धुमाकुळाने कोवळ्या पिकाचे मोठे नुकसान

46

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

तालुक्यातील हडोळती, किनगाव, शिरूर ताजबंद, आंधोरी, खंडाळी, रोकडा सावरगाव परिसरात हरणांच्या कळपाने धुमाकुळ घातला असून सोयाबीन, कापूस, तुर, मुग या कोवळ्या पिकाचा नायनाट करीत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.

तालुक्यात हरणांच्या वाढत्या संख्येमुळे मोठे कळप झाले आहेत. कोवळी पिके हरिण फस्त करत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. हरिणाना पकडणे किंवा मारणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे त्यामुळे शेतकरी हरिणाचा बंदोबस्त करण्यासाठी धजावत नाही. तालुक्यात अगोदरच उशिरा पेरणी झालेली असून उत्पादनात घट येणार आणि हारिणामुळे शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे. या कोवळ्या अंकुरलेल्या पिकावर हरिण व काळवीट ताव मारत आहेत. कळपामध्ये 30 ते 35 हरिणांचा समावेश आहे त्यामुळे रातोरात हे कळप पिके फस्त करत आहेत. आधीच दुष्काळी परिस्थीतीत कर्जबाजारी होऊन पेरण्या केल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अहमदपूर व परिसरातील हरीणाच्या कळपाचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या