हिंदुस्थानचे फ्रान्समध्ये शस्त्रपूजन; ‘राफेल’ हवाई दलात दाखल

449

हिंदुस्थानी हवाई दलासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. हवाई दलाच्या ताफ्यात ‘राफेल’ हे लढाऊ विमान दाखल झाले  आहे. हे विमान हवाई दलाच्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्समधील मेरीनेकच्या दसॉ हवाई तळावर आहेत. त्यांच्याहस्ते राफेलचे शस्त्रपूजन झाले आहे. तसेच हिंदुस्थान आणि फ्रान्सदरम्यान महत्त्वाच्या संरक्षण कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे. राफेलचे शस्त्रपूजन झाल्यानंतर हे लढाऊ विमान हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. हवाईदलाच्या 87 स्थापनादिनीच राफेल ताफ्यात दाखल झाले आहे.

हवाई दलाच्या ताफ्यात राफेल दाखल करून घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मेरीनेकच्या हवाई तळावर पोहचले आहेत. त्यांनी या युनिटची पाहणी केली असून त्यांच्याहस्ते राफेलचे शस्त्रपूजन होणार आहे. त्यानंतर राजनाथ सिंह राफेलमधून उड्डाणही करणार आहेत. हे लढाऊ विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी हिंदुस्थानी हवाई दलाच्या पथकाला फ्रान्सकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे.

‘राफेल’ लढाऊ विमानाचे Exclusive फोटो

हिंदुस्थानने फ्रान्सकडून 36 राफेल विमाने खरेदी केली आहेत. ही सर्व विमाने 2022 पर्यंत हिंदुस्थानला मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात हवाई दलाच्या ताफ्यात चार विमाने दाखल होणार आहेत. त्यानंतर चार-चारच्या टप्प्यात ही विमाने हिंदुस्थानला मिळणार आहेत. त्यापेकी 18 विमाने अंबाला हवाई तळावर तैनात ठेवण्यात येणार आहेत. तर इतर 18 वमाने पश्चिम बंगालच्या हाशीमारा हवाई तळावर तैनात करण्यात येतील.

 

आपली प्रतिक्रिया द्या