बकरी ईदला कामावर अनुपस्थित राहिल्यामुळे दिल्लीत 36 पोलिसांचे निलंबन

733

नवी दिल्लीत आता कोरोनाचा फैलाव कमी होत असल्याने सण उत्सवातील गर्दी टाळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे सण उत्सावातील सुरक्षा आणि गर्दी टाळण्यासाठी दिल्ली पोलीस प्रयत्न करत आहेत. बकरी ईदनिमित्त शहरात पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली आहे. मात्र, काही पोलीस ऐन बकरी ईदच्या दिवशी कामावर अनुपस्थित असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तर पश्चिम दिल्लीतील डीसीपी विजयंता आर्या यांनी ही कारवाई केली आहे. एकूण 36 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बकरी ईदनिमित्त शहरात सुरक्षेची व्यवस्था आणि बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती. या 36 पोलिसांनी शनिवारी बकरी ईदच्या दिवशी सकाळी 5 वाजता तैनातीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, हे 36 पोलीस कर्मचारी अनुपस्थित असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीतील अशा परिस्थितीत पोलीस कर्माचारी अनुपस्थित असल्याने डीसीपी विजयंता आर्या संतापल्या. त्यांनी 36 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर थर्मल तपासणी केल्यावरच पोलिसांनी जामा मशीदीत नमाज अदा करण्यासाठी प्रवेशाची परवानगी दिली. नवी दिल्लीत काही ठिकाणी कोरोना संकट आणि प्रशासनाचे आवाहन लक्षात घेत सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करण्यात आले. तर काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र दिसत होते. मात्र, ऐन सणाच्या दिवशी 36 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या