इराकी महिलेच्या गळ्यातून काढले 53 खडे

759
प्रातिनिधीक फोटो

नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांना दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात यश मिळाले आहे. एका इराकी महिलेच्या (66) गळ्यावर अवघड शस्त्रक्रिया करून 53 खडे काढण्यात आले आहेत.

रुग्ण महिला इराकची असून वरचेवर गळा सूजण्याची व दुखण्याची तिला तक्रार होती. अनेक उपचार करुनही उपयोग होत नसल्याने ती निराश झाली होती. पण तिला एकाने हिंदुस्थानात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ती दिल्लीत आली. येथील सर गंगाराम रुग्णालयात तिच्या तपासण्या केल्या गेल्या. त्यात तिच्या गळ्यातील नलिकांमध्ये एक दोन नव्हे तर चक्क ५३ खडे असल्याचे डॉक्टरांना आढळले. यातील एक खडा आठ सेंटीमीटर एवढा होता. तो काढणे हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. पण डॉक्टरांनी जिद्द ठेवत शस्त्रक्रिया केली व तिच्या गळ्यातून 53 खडे काढले. महिला सुखरुप असून तिला घरी पाठवण्यात आले आहे. ती सामान्य व्यक्तीप्रमाणेच आहार घेऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे.  विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया विनाटाक्याची होती. बास्केट व फोरसेप्सचा उपयोग करून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या