हिंदुस्थानात 70 लाख कोटींचे सोने

302
gold

सणासुदीचे दिवस, विशेषत दिवाळी आली की सोन्याची मागणी वाढत जाते. हिंदुस्थानात सोन्याची वार्षिक मागणी ही जगभरातील मागणीच्या एकचतुर्थांश इतकी असते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानातील घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये 70 लाख कोटींपेक्षा अधिक सोने आहे. जगभरात जेवढे सोने आहे त्यापैकी 15 टक्के सोने हे हिंदुस्थानात आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानात सर्वाधिक सोने आहे. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेत 8133 टन सोने आहे. त्यापेक्षा तिप्पट सोने हिंदुस्थानात आहे.

गेल्या काही महिन्यांत सोन्याची किंमत अंदाजे 20 टक्क्यांनी काढली आहे. ग्राहकांमध्ये किमतीबाबतची काढती जागरूकताही खरेदीत मोलाची भर घालत आहे. सणासुदीच्या दिवसांच्या प्रारंभीच्या काळापेक्षा आता ग्राहकसंख्या वाढताना दिसत असून यंदा मोठय़ा प्रमाणात असलेले शुभमुहूर्त आणि मोठा काळ चालणारा लग्नांचा कालावधी पाहता या तिमाहीमध्ये सोने खरेदीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या