दिल्ली : अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद !

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्ली बाईक आणि कारच्या अपघातात बाईकस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दिल्लीतील सिव्हील लाईन मेट्रो स्टेशन परिसरात ४ एप्रिलला हा अपघात झाला आहे.

त्रिनेश कुमार हा एलएलबीचा विद्यार्थी बाईकने आपल्या घरी जात होता. अचानकपणे एका मर्जिडीसने त्याच्यासमोर यु-टर्न घेतला, मात्र त्रिनेशला आपली बाईक पटकन थांबवता न आल्यानं तो थेट कारला जाऊन धडकला. टक्कर इतकी भीषण होती की त्रिनेश ५ फूट हवेत उडाला. अपघातानंतर त्रिनेशला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मर्सिडीस चालक मनिष जैन पोलिसांना शरण गेला होता. त्यानंतर त्याला लगेचच जामिन देखील मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या