कार थंड राहावी म्हणून तिने लक्झरी कारला फासले शेण

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मे महिन्यातील कडक उन्हापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाययोजना करत असतो. यात उन्हामुळे डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून गॉगल वापरला जातो तर त्वचेची काळजी घेण्यासाठी सुती कपडे वापरले जातात. पण गुजरातमधील अहमदाबाद येथे एका महिलेने उन्हापासून बचाव व्हावा म्हणून चक्क लक्झरी कारलाच शेणाचे कोटींग केल्याचे समोर आले आहे. या महिलेकडे Corolla Altis ही आलिशान कार असून तिने संपूर्ण कारच शेणाने सारवली आहे. या कारचा फोटोही सोशल साईटवर व्हायरल झाला आहे. सेजल शहा असे या महिलेचे नाव आहे.

गुजरातमध्ये सध्या  45 डिग्री सेल्सियस तापमान असून नागरिकांची उन्हाने काहीली होत आहे. कडक उन्हामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे. यामुळे सेजल या महिलेने कारवरच शेण थोपले. जेणेकरून कारचे टप गरम होणार नाही व कार थंड राहील. सेजलच्या या कारचा फोटो रुपेश दास नामक व्यक्तीने फेसबुकवर शेअर केला आहे. यावर ेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या