आजम खान, मनेका गांधी यांनाही प्रचारबंदी

16

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

योगी आदित्यनाथ, बसपा नेत्या मायावती यांना प्रचारबंदी केल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सपा नेते आजम खान, भाजप नेत्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनाही प्रचारबंदी केली आहे.

सपा नेते आजम खान यांनी भाजप उमेदवार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात अश्लील वक्तव्य केले होते. त्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर 72 तासांसाठी प्रचारबंदी घातली आहे. भाजप नेत्या मनेका गांधी यांनी मुस्लिम समाजाला मत देण्यासाठी धमकावले होते. याप्रकरणी आयोगाने त्यांना 48 तास प्रचारबंदी केली आहे. या काळात या दोन्ही नेत्यांना कोणत्याही सभा, रॅली, रोड शोमध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच सोशल मीडियावरूनही प्रचार करता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या