8 फेब्रुवारीला दिल्लीत हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामना, भाजपच्या नेत्याचे वादग्रस्त ट्वीट

1166
kapil-mishra

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 8 फेब्रवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. आम आदमी पक्ष (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांनी 8 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या रस्त्यांवर हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार असल्याचे ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

कपिल मिश्रा यांनी दिल्लीच्या निवडणुकांचा संबंध थेट पाकिस्तानशी जोडला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेकांनी त्यांच्या या ट्वीटला लक्ष्य करत असं विधान करणं अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

याआधी 2015 मध्ये बिहार विधानसभ निवडणुकांमध्ये पाकिस्तान अचानक चर्चेचा केंद्र बिंदू बनला होता. तेव्हा देखील भाजपकडूनच असं विधान करण्यात आलं होतं. अमित शहा हे त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. शहा यांनी बिहारमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाआधी रक्सौल येथील सभेला संबोधित केलं होतं. त्यावेळी शहा म्हणाले होते की, बिहारमध्ये भाजप पराभूत झाल्यास पाकिस्तानात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला जाईल. मात्र अशी विधानं करून देखील भाजला बिहारमध्ये सत्ता मिळाली नव्हती. मात्र त्यांच्या विधानावरून तेव्हा प्रचंड वाद झाला होता. निवडणूक आयोगाकडे याची तक्रार देखील करण्यात आली होती.

आत मिश्रा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा उल्लेख केला. दिल्लीतील सत्ताधारी आपने वीज, पाणी, शिक्षण हे मुद्दे प्रचारासाठी उचलले आहेत. तर केजरीवाल सरकारला लक्ष्य करताना कपिल मिश्रा यांनी पाकिस्तानला खेचलं आहे. त्यामुळे आप या ट्वीटला कसे उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या