#AYODHYAVERDICT अयोध्येच्या निकालाचं टायमिंग चुकलं… पाकिस्तान बरळला

3560

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे आणि मशिदीसाठी पाच एकर जमीन देण्यात येईल असा निर्णय सर्वौच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. पण शेजारील देश असलेल्या पाकिस्तानने मात्र सर्वौच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येच्या निकालाचं टायमिंग चुकलं असून हिंदुस्थानने असंवेदशीलपणा दाखवल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानप्रमाणेच पाकिस्तानचेही लक्ष अयोध्या प्रकरणाकडे होते. त्यातच शनिवारी पाकिस्तानने हिंदुस्थानमधील शिखांसाठी करतारपुर कॉरिडोर खुले केले आहे. यामुळे या आनंदाच्या क्षणी अयोध्येवर निकाल देऊन हिंदुस्थानने असंवेदनशीलता दाखवली आहे. याचे आपल्याला फार दु:ख झाले आहे. आजच्या दिवशी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायला नको होता. कारण अयोध्या प्रकरण हा संवेदनशील मुद्दा आहे. यामुळे आजच्या आनंदाच्या दिवशी त्याबद्दल बोलणेही योग्य नाही. असे कुरैशी यांनी डॉन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. स्वातंत्र्यानंतर पहील्यांदाच कुठल्याही अडचणींशिवाय हिंदुस्थानी नागरिक करतारपूर साहिब गुरुद्वारात दर्शनाला जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या