नको तेथे मधमाशांचं पोळ, क्रीडामंत्र्यांनी शेअर केला व्हिडीओ

744

मधमाशांचं पोळं म्हटलं तरी जीव घाबराघुबरा होतो. झाडाच्या फांदीवर तर कधी इमारतीच्या सज्जावर किंवा उंच ठिकाणी हे पोळे आढळते. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एका तरुणाच्या पार्श्वभागावरच मधमाशांनी पोळं तयार केल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे हा अजब व्हिडीओ दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तसेच आगळ्या वेगळ्या ठिकाणी मधमाशांचे पोळे लटकण्याची घटना फक्त नागालँडमध्येच घडू शकते असेही त्यांनी या व्हिडीओखालील पोस्टमध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ बघून सगळेजण हैराण झाले आहेत. ज्या तरुणाच्या पार्श्वभागावर हे पोळे दिसत आहे. त्याने जिन्स घातलेली असून तो मात्र या घटनेची मजा घेताना व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या