निर्भया प्रकरणातील दोषींना वाचवण्याचा ‘आप’चा प्रयत्न; मनोज तिवारी यांचा आरोप

400
manoj-tiwari

निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणावरून भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आप सरकारवर निशाणा साधला आहे. दोन वर्षात दोषींच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्याची गरज होती. मात्र, आप सरकारने याची माहिती दिली नाही. हे प्रकरण तुरुंग विभागाशी संबंधित आहे आणि हा विभाग दिल्ली सरकारच्या अंतर्गत येतो. दिल्लीतील आप सरकार योग्य वेळेत माहिती दिली नाही. मात्र, दिल्ली पोलीस विभाग आमच्याकडे असता तर आम्ही दोषींना शिक्षा दिली असती असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे, हा विरोधाभास असल्याचेही तिवारी म्हणाले.

केजरीवाल सरकारने त्यांचे काम केले नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केजरीवाल सरकार मुद्दाम दोषींना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला. हा राजकारणाचा प्रश्न नसून गंभीर प्रकरणातील दोषींना पाठिशी घालण्याचे काम होत आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणातील दोषींची शिक्षा लांबणीवर पडत असल्याने निर्भयाच्या आईने आप आणि भाजप सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

आप सरकारकडे दोन दिवस पोलीस यंत्रणा देण्यात यावी, आम्ही दोषींना फासवर लटकवू असे वक्तव्य दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले आहे. निर्भयाच्या दोषींच्या शिक्षेच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबाला आप सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींना आता 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या