
दिल्लीत सोमवारी कारमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला. देशाच्या तपास यंत्रणेसाठी मोठे आव्हान असताना आता दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाईंण्ड मौलवी इरफान अहमद असल्याचे समोर आले आहे. तो जम्मू काश्मिरच्या सोफिया जिल्ह्यात राहणारा आहे.
गुप्त यंत्रणांच्या माहितीनुसार,मौलवी इरफान याने फरीदाबादच्या मेडीकलचे विद्यार्थी आणि डॉक्टरांना कट्टरपंथी विचारांनी प्रभावित केले. याच कारणामुळे व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल बोलले जात आहे. कारण या घातपाताच्या कटात असलेले दहशतवादी मेडिकल क्षेत्राशी जोडलेले आहेत. सध्या दिल्ली पोलीस, राष्ट्रीय तपास संस्था आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह संपूर्ण नेटवर्क एकत्र करण्याचे काम करत आहेत. सुरक्षा संस्था या मॉड्यूलचे परदेशी निधीशी काही संबंध आहेत का हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
इरफान याआधी श्रीनगरच्य़ा गव्हर्नमेण्ट मेडीकल कॉलेजमध्ये पॅरामेडीक म्हणून कार्यरत होता आणि तिथूनच त्याने विद्यार्थ्यांशी संपर्क करायला सुरुवात केली. तो नौगाम मस्जिदचा इमामही होता आणि त्याच दरम्यान त्याने तरुणांना कट्टरपंथाचा मार्ग दाखवला. तपास यंत्रणांच्या म्हणण्यांनुसार, मौलवी इरफान हा जैश ए मोहम्मदच्या विचारांनी प्रभावित होता आणि तिथूनच तो विद्यार्थ्यांना जैश चे व्हिडीओ दाखवून त्यांना जिहादच्या नावावर प्रवृत्त करत होता. तो VOIP कॉल्सच्या माध्यमातून अफगाणिस्थानात एकाशी सतत संपर्कात होता.
सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, फरीदाबाद येथे अटक केलेल्या डॉ. मुजम्मिन शकील, डॉ.उमर आणि डॉ. मोहम्मद उमर आणि डॉ.शाहीन सईद हे कोणत्या ना कोणत्या कारणाने मौलवी इरफान याच्या प्रभावाखाली होते. मौलवी इरफान याला अफगाणिस्तानच्या नंगरहाक प्रांतातून तोंडी आणि वैचारिक टेलिग्राम आणि श्रीमा सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मचा वापर करुन जैशचा प्रचार करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या.
या संपूर्ण मॉडेलची सुरुवात 27 ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या नौगाम परिसरात झाली, जिथे जैश ए मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात आधी तिघांना अटक केली, त्यांच्या माहितीवरुन ते मौलवी इरफान अहमदपर्यंत पोहोचले.
Delhi Bomb Blast – i20 कार दिल्लीत कशी पोहोचली? सीसीटीव्ही फुटेज समोर, मिळाली नवी माहिती
इरफानच्या चौकशीदरम्यान पोलिसांना डॉ. आदिल अहमद राथेर आणि जमीर अहनगर यांची नावे मिळाली होती. त्यांना नंतर अटक करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक फरिदाबादला गेले, जिथे डॉक्टर आणि विद्यार्थ्यांद्वारे मॉड्यूलचे नेटवर्क पसरवले जात होते. याच नेटवर्कचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
फरिदाबाद मॉड्यूल उघडकीस आल्यानंतर घाबरलेल्या डॉ. मोहम्मद उमर याने हा स्फोट घडवून आणला. उत्तर प्रदेशातील रहिवासी डॉ. शाहीन सईद ही या मॉड्यूलची वित्तपुरवठादार आणि सहयोगी असल्याचे सांगितले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहीन आणि उमर यांची भेट फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात झाली होती, जिथे मौलवी इरफान वारंवार विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक उपदेश करत असे.

























































