
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेत आता आणखी एक मोठी माहिती उघड झाली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी आपल्या चॅटबॉक्समध्ये कोडवर्ड्सची मदत घेतली आहे. हे कोड इतके साधे आहेत की, कोणालाच त्यावर संशय येणार नाही. पण त्या कोडवर्ड्समध्येच बॉम्बस्फोटाचा कट रचला जात होता.
दिल्ली बॉम्बस्फोट तपासात ‘दावत के लिए बिरयानी तैयार है’ असा उल्लेख होता. तपास यंत्रणांना एक डिजिटल चॅटबॉक्स मिळाला. जिथे दहशतवाद्यांनी आपली संपूर्ण योजना कोडवर्ड्सद्वारा आखली होती. दावतचा अर्थ धमाका होता तर, ‘बिर्याणी’चा अर्थ स्फोटक सामग्री होता. सायबर नजरेतून वाचण्यासाठी त्यांनी ही युक्ती आजमावली. तपासात हा मेसेज शाहीनकडून पाठवण्यात आला होता. अशी माहिती एनआयएच्या डिजिटल फॉरेन्सिक तपासातून समोर आला आहे.
लाल किल्ल्याजवळील स्फोट हा एका संघटित मॉड्यूलचे काम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जैश-ए-मोहम्मद सारख्या पाकिस्तान येथील गटांशी संबंध असल्याचा संशय आहे. आता या स्फोटाचा तपास एनआयए करत आहे. सायबर सेल चॅटमधील उर्वरित सदस्यांचा माग काढत आहे. दिल्ली पोलिसांनी हरयाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू-कश्मीरमधून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर आहे.


























































