IPL 2021 संजू सॅमसनची एकाकी झुंज, राजस्थानचा पराभव करत दिल्ली अव्वल स्थानी

अबू धाबीच्या शेख जाएद मैदानावर खेळलेल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या 36 व्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा 33 धावांनी पराभव केला. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीचा दहाव्या लढतीतील हा आठवा विजय आहे. आजच्या विजयामुळे दिल्लीचा संघ चेन्नई सुपर किंग्जला पछाडत गुणतालिकेमध्ये 16 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे.

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 155 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 6 बाद 121 धावा करू शकला. कर्णधार संजू सॅमसन याने नाबाद 70 धावांची खेळी केली, मात्र इतर खेळाडूंनी साथ न दिल्याने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. संजू व्यतिरिक्त फक्त लोम

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करतना दिल्लीने 20 षटकात 6 बाद 154 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 43 धावा केल्या. अय्यरसह पंतने 24, हेटमायरने 28, यादवने 14 आणि अक्षर पटलने 12 धावांचे योगदान दिले.

आपली प्रतिक्रिया द्या