केंद्रीय कृषी कायद्याविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी आक्रमक, दिल्लीच्या दिशेने कूच

केंद्र सरकारच्या कृषी कायदाच्या विरोधात पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले आहे. यासाठी शेतकरी अंबाला येथील शंभू बॉर्डरवर जमा झाले आहेत. पंजाबातून हजारो ट्रॅक्टरमध्ये धान्य, पाणी, डिझेल आणि औषधं घेऊन शेतकरी येथे जमा झाले आहेत.

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. अंबाला-कुरुक्षेत्र राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला तेव्हा संतप्त शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स उचलून उड्डाण पुलावरून खाली फेकून दिली. आंदोलकांनी दगडफेक देखील सुरू केली.

पोलिसांनी संतप्त आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रू-धुराच्या नळकांड्याही फोडल्या. यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. शेतकरी आणि पोलिसांमध्ये बराचवेळ बाचाबाची देखील सुरू होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही शेतकरी ठिकठिकाणी जमून कृषी कायद्याचा विरोध करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या