मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, केजरीवाल क्वारंटाईन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुनीता केजरीवाल या होम क्वारंटाईन असून अरविंद केजरीवालही क्वारंटाईन झाले आहेत.


गेल्या काही दिवसांत दिल्लीतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दररोज 20 हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तसेच मृतांचे प्रमाणही वाढले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन जारी करण्या आला आहे.दिल्लीत सध्या फक्त 1 ह्जार 186 बेड्स बाकी आहेत. दिल्लीत 16 हजार 418 रुग्णांवर उपचार सुरू असून 4 हजार 395 रुग्ण आयसीयूत आहेत. दिल्लीत आता केवळ 45 आयसीयू बेड्स शिल्लक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या