अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणं पडलं महागात, अल्पवयीने मुलीने घेतली पोलिसात धाव

सोशल मीडियावर अनोळखी तरुणाशी मैत्री करणं एका अल्पवयीन मुलीच्या चांगलेच अंगाशी आले आहे. चौदा वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करु लागला. त्याच्या मागण्यांना नकार दिल्यानंतर तो ब्लॅकमेल करु लागला. अखेर सायबर पोलीसात धाव घेतली.

सायबरच्या पोर्टलवर 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मुलीने इंस्टाग्रामच्या चॅटवरुन एकाला खासगी फोटो आणि व्हिडीओज शेअर केले होते. त्यांना हे फोटो आणि व्हि़डीओज व्हायरल केल्याची शंका आहे. मात्र याप्रकरणी पीडित मुलीचे वडिल आधी कारवाई करु इच्छित नव्हते. मात्र ज्यावेळी पीडितेसह तिच्या वडिलांचे समुपदेशन करण्यात आले त्यावेळी त्यांनी कारवाई करण्यास होकार दिला.

पिडीत मुलीने सांगितले की, तिने आपले खासगी फोटो आणि व्हिडीओज इंस्टाग्राम चॅटवरुन तिच्या एका मित्राला पाठवले होते. त्याने त्या गोष्टीचा फायदा घेत तो तिच्याकडून वेगवेगळ्या मागण्या करत होता. पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी एसआय दीपा यांच्या नेतृत्वाखाली एसआय ऋचा शर्मा, हेड कॉन्स्टेबल सोनिका आणि गिता यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून त्या व्यक्तीची ओळख पटवली.

आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. तो ग्रॅज्युएशन करत आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि सिमकार्ड जप्त केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याच्याकडे मुलीचे काही खासगी फोटो आहेत, जे त्याने मोबाईलमध्ये सेव्ह केले आहेत आणि तो तिला ब्लॅकमेल करु लागला. तिच्याशी मैत्री झाल्यावर त्याने मुलीला तिचा न्यूड फोटो मागितला. पण, जेव्हा मुलीने नकार दिला तेव्हा त्याने तिला सांगितले की त्याच्याकडे तिचे खाजगी फोटो आधीच आहेत. त्याने पीडित मुलीला तिचे फोटो दाखवले आणि नंतर तिच्यावर वाईट गोष्टी आणि अधिक खाजगी फोटो देण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तो इतर मुलींनाही त्रास देत होता.आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची तपासणी केली असता, तो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अन्य मुलींनाही अशाच प्रकारचा छळ करत असल्याचे आढळून आले. मुलींसमोर दाखवण्यासाठी त्याने त्याच्या आई-वडिलांना आयफोन खरेदी करण्यास भाग पाडले.