सकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं?

90

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तुमची दिवसाची सुरुवात ही रिकाम्या पोटी कॉफी पिऊन होत असेल तर सावधान. कारण रिकाम्या पोटी कॉफी पिल्याने तुमचं डोकं तर फिरतंच पण त्याबरोबरच शरीरात कोलेस्ट्रॉलही वाढतं आणि चयापचय क्रियाही मंदावते, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

नॅशनल कॉफी असोसिएशनने ‘कॉफीचा मानवी शरीरावर होणारा परिणाम’ यावर आधारित नुकतचं एक संशोधन केलं. त्यात 63 टक्के अमेरिकी नागरिक सकाळी डोळे उघडताच एक कपभर कॉफी पितात. याचा त्यांचा शरीरासह व मनावरही दुष्परिणाम होत असल्याचं समोर आलं. त्यातही ज्या व्यक्ती नाश्त्याच्या आधी कॉफी पितात त्यांच्या शरीरात कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण झपाट्याने वाढतं. चयापचय क्रियाही मंदावते. तसेच रोगप्रतिकारकशक्ती आणि तणावावर नियंत्रण ठेवणाऱ्या हार्मोन्सवरही परिणाम होतो, असे नॅशनल कॉफी असोसिएशनच्या डॉक्टर निकोला जोर्जेविक यांनी सांगितले आहे.

सकाळी उठल्याबरोबर शरीर कॉलेस्ट्रॉल तयार करण्यास सुरुवात करते. अशावेळी जर तुम्ही कॅफीन असलेली कॉफी पित असाल तर शरीराबरोबरच तुमच्या मानसिक अवस्थेवरही त्याचा नकारात्मक प्रभाव होतो असं संशोधकांच म्हणणं आहे. हे संशोधन मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलं. यावेळी जे विद्यार्थी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कॉफी प्यायचे. त्यांच्या शरीराबरोबरच मानसिक अवस्थेत नकारात्मक बदल झाल्याचे संशोधकांना आढळले. शरीरात अॅसिडचे प्रमाण वाढल्याने त्यांचे मूड सतत बदलत होते. ते मध्येच शांत व्हायचे तर दुसऱ्याच क्षणाला आक्रमक व्हायचे, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवल्याचे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या