दिल्ली – भाजपचा वचननामा, गडकरी म्हणाले ‘ही’ आहे सगळ्यात मोठी समस्या

1044
delhi-bjp

Delhi Election 2020 दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. दिल्लीत ‘आप’ची सत्ता आहे आणि भाजपने सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला आहे. दिल्ली जिंकण्यासाठी भाजपने मोठी फौज मैदानात उतरवली आहे. निवडणुकीसाठी काही दिवसच शिल्लक असून भाजपने आपले संकल्प पत्र जारी केले आहे.

शुक्रवारी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद बोलवून संकल्प पत्र (वचननामा) जाहीर केले. यावेळी बोलता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की आम्ही दिल्लीचं नशिब बदलवणार आहोत. दिल्लीत सर्वात मोठी आणि गंभीर समस्या वायु-जल प्रदूषणाची आहे. आमचे केंद्रातील सरकार या दोन्ही प्रदूषणासंदर्भात काम करत आहे.

दिल्लीकरांना स्वच्छ पाणी देण्यावर आमच्या सरकारचा जोर आहे. केंद्र सरकारने निर्मल गंगा योजनेअंतर्गत 7000 कोटीचे प्रकल्प राबवले आहेत. त्यानुसार दिल्लीत 2070 पर्यंत स्वच्छ पाण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच सरकारने वेस्टर्न-ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वे बनवण्यावर काम केले आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, वचननामा प्रसिद्ध करतेवेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी आणि अन्य स्थानिक नेते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या