निवडणूक आयोगाची भाजपला चपराक, प्रचारकांच्या यादीतून दोघांची नावे हटवण्याचे आदेश

4200
jp-nadda-pc

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून वादग्रस्त विधानं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशा विधानांना चाप बसवण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने कडक पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वादग्रस्त विधानं करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रवेश वर्मा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांना निवडणूक आयोगाने तडाखा दिला आहे. भाजपने अनुराग ठाकुर आणि प्रवेश वर्मा यांची नावे स्टार प्रचारच्या यादीतून हटवण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते दिल्ली निवडणुकीदरम्यान पक्षाचा प्रचार करू शकणार नाहीत.

भाजप नेते परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी ठरवत त्यांची तुलना कश्मीरमधील दहशतवाद्यांशी केली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले होते.

‘दिल्लीत सध्या अनेक नटवरलाल आणि केजरीवालांसारखे दहशतवादी लपले आहेत. आम्हाला कळत नाही की आम्ही कश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढायचे की दिल्लीतील केजरीवाल या दहशतवाद्याशी’, असे विधान त्यांनी केले आहे. मंगळवारी देखील परवेश वर्मा यांनी शाहीन बागमधील आंदोलकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी या आंदोलकांना बलात्कारी व खूनी म्हटले होते. ‘ हे लाखो आंदोलक तुमच्या घरात घुसतील व तुमच्या आया बहिणींचे बलात्कार करून खून करतील’, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधी पक्षांवर निशाणा साधत ‘देशातील गद्दारांना गोळ्या घातल्या पाहिजे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या