केजरीवाल यांनी ‘जन की बात’ देशाला दाखवून दिली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

4508

आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दिल्ली विभानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा विजय मिळवल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल आणि आपचे अभिनंदन केले.

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन. दिल्लीतील जनतेने ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथीत राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाडू समोर टिकाव लागला नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना करुन, स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुनही अरविंद केजरीवाल यांना ते पराजीत करू शकले नाहीत.

दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे ऊभी राहिली आणि जनतेने लोकशाही वरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील ‘भ्रमाचा भोपळा’ ही दिल्लीकर मतदारांनी फोडला. दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिली आहे.

saheb

आपली प्रतिक्रिया द्या