Farmers Protest Violence – मेधा पाटकर आणि योगेंद्र यादव यांच्यासह 37 शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल

शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून देशभरात खळबळ उडाली आहे. या हिंसाचारावरून राजकारणही सुरू झाले आहे. दरम्यान, या हिंसाचाराची 37 शेतकरी नेते जबाबदार असल्याचे सांगणात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. यात मेधा पाटकर, बूटासिंग आणि योगेंद्र यादव यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

शेतकरी ट्रॅक्टर रॅलीनंतर झालेल्या हिंसाचाराचा तपास दिल्ली पोलीस करत आहे. या गुन्ह्यासाठी दोषी असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. या हिंसाचारानंतर पोलिसांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सांगणायत आले आहे की, शेतकरी नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर जो मार्ग या रॅलीसाठी निश्चित करण्यात आला होता, त्या मार्गाने रॅली निघाली नाही. हे केवळ प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या परेडमध्ये अडथळा आणण्यासाठी करण्यात आले आहे, असे या एफआयआर मांडण्यात आले आहे.

या हिंसाचारात 83 दिल्ली पोलीस जखमी झाले आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसाचारानंतर अधिकृत माहिती देताना दिल्ली पोलिसांनी असे म्हटले आहे की, राजधानी दिल्लीत शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान शेती कायद्याविरूद्ध झालेल्या हिंसाचारात 83 पोलीस जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या