अक्षरधाम मंदिराबाहेर अज्ञाताचा पोलिसांवर गोळीबार 

379

अक्षरधाम मंदिराजवळ रविवारी सकाळी चार अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गेल्या काही दिवसांपासून अक्षरधाम मंदिराबाहेर लूटमार होत असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मंदिराजवळ बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्तादरम्यान पोलिसांनी या अज्ञात इसमाच्या गाडीस थांबण्यास सांगितले असता या इसमांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही आहे. या हल्लेखोरांबद्दल अद्याप अधिक माहिती मिळाली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या