कमल हसन यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजकीय पक्ष आणि नेत्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचा गैरवापर करण्यापासून रोखण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी करणारी भाजप नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. अभिनेते कमल हसन यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करताना स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला अतिरेकी हिंदू होता अशी शेरेबाजी केली होती.

हसन यांचा रोख गांधी हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर होता. या वक्तव्याला आक्षेप घेत अश्विनीकुमार यांनी जनहित याचिका दाखल केली होती, पण राजकारणासंदर्भात अथवा निवडणूक प्रक्रियेबाबतचे धोरण केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरवावे, असे सांगत निर्णयाचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टमध्ये धाडला. आपल्या याचिकेत उपाध्याय यांनी निवडणुकीतील लाभासाठी धर्माचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर बंदी यावी आणि पक्षांची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या