VIDEO – दिल्लीत पावसाचा कहर, पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली झोपडपट्टीतली घरं

455

दिल्लीत शनिवारपासून पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार झालेल्या पावसाने अनेक भागात पाणी भरले आहे. आतापर्यंत या पावसाने दोघांचा बळी घेतला आहे. दरम्यान दिल्लीतल्या पूरपरिस्थितीचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत नाल्याशेजारील झोपडपट्टीतली दोन घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून वाहून गेली आहे.

दिल्लीतील अण्णा नगर येथील नाल्याजवळ एक झोपडपट्टी आहे. अतिवृष्टीमुळे हा नाला भरून वाहत आहे. नाल्यातून वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे नाल्याला लागून असलेल्या या झोपडपट्टीतील दोन कच्ची घरं पाण्याच्या प्रेशरमुळे नाल्यात कोसळली. सुदैवाने त्या घरात कोणीही नसल्याने जिवीत हाणी झालेली नाही. मात्र त्य़ानंतर ही झोपडपट्टी पूर्ण खाली करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या