देशभरात पूराचे थैमान, जीवघेण्या पावसाने केरळमध्ये घेतले 111 जणांचा बळी

313

देशभरात जीवघेण्या पावसाने धूमाकूळ घातला असून अनेक राज्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात पूर ओसरला असला तरी केरळ, राजस्थान, हरयाणा, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यात पूर आल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकट्या केरळमध्येच गेल्या दहा दिवसात 111 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर राजस्थानमध्ये गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे केरळमध्ये 31 जण बेपत्ता आहेत. केरळमधील अनेक गावे पाण्याखाली बुडाल्याने मदत कार्यास अडथळे येत आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून हाय अलर्टही जारी केला आहे.

हिमाचलमध्ये शुक्रवारी संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर राजस्थानमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येथील कोटा, बारा, भीलवाडा, झालावाड आणि बूंदी जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याने लष्करालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या