पी. चिंदबरम यांना अटक होण्याची शक्यता, हाय कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

861

दिल्ली उच्च न्यायालयाने माजी केंद्रिय अर्थमंत्री पी चिंदबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक पूर्व जामीन फेटाळला आहे. न्यायाधीश सुनील गौर यांनी हा निर्णय दिला आहे.

चिंदबरम यांनी कोर्टाकडे तीन दिवसांची मुदत मागितली आहे. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर इडी आणि सीबीआय त्यांना अटक करू शकतात. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडियासाठी फॉरेन इन्वेस्टेमेंट प्रमोशन बोर्डाकडून बेकायदेशीररित्या परवानगी देण्यासाठी 305 कोटींची लाच घेण्याचा आरोप आहे. या केसमध्ये चिंदबरम यांना 24 वेळा अटक टळली आहे.

2007 साली जेव्हा चिंदबरम केंद्रिय अर्थमंत्री होते तेव्हाचे हे प्रकरण आहे. या प्रकरणी सीबीआय आणि इडीनकडून चिंदबरम पिता पुत्रांना अटक झाली आहे. दोघेही आता जामीनावर बाहेर आहेत. 4 जुलै रोजी जेव्हा इंद्राणी मुखर्जीने सरकारी साक्षीदार म्हणून जवाब नोंदवला तेव्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या