ऑक्सिजनशिवाय लोकांचा जीव जातोय, तुम्ही इतके असंवेदनशील कसे? दिल्ली हायकोर्टाने केंद्राला झापले

देशातील राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारची दिल्ली उच्च न्यायालयाने आज चांगलीच खरडपट्टी काढली. संपूर्ण देश ऑक्सिजनसाठी तडफडतोय, पण तुम्हाला लोकांची काहीच चिंता नाही, वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचा जीव जातोय तरीही तुम्ही त्याकडे डोळेझाक करताय, तुम्ही याबाबतीत इतके असंवेदनशील कसे, असे खडसावत न्यायालयाने केंद्राला धारेवर धरले. इतकेच नव्हे तर झेपत नसल्यास व्यवस्थापन आयआयटी, आयआयएमकडे द्या, ते तुमच्या पेक्षा उत्कृष्ट काम करतील, असे खडे बोलही कोर्टाने सुनावले.

हायकोर्टाचे ताशेरे

  • केंद्राने कितीही दावा केला तरी दिल्लीसह अनेक राज्यांत ऑक्सिजनचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा आहे
  • ऑक्सिजन अभावी लोकांचा तडफडून मृत्यू होतोय याला जबाबदार कोण
  • लोकांच्या भावनांशी खेळू नका, त्यांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून देणे ही पेंद्राची जबाबदारी
  • राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात अपयशी ठरल्याबद्दल तुमच्यावर अवमानाची कारवाई का करण्यात येऊ नये
आपली प्रतिक्रिया द्या