जेटलींनी घडवले कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य

828

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सगळा देश शोकसागरात बुडाला असून अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. याचदरम्यान जेटली यांच्या चांगुलपणाच्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. देशाबरोबरच जेटली यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता होती. यामुळे या मुलांना चांगल्यात चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते वकिलीतून मिळणाऱ्या काही रकमेचा भाग मुलांच्या शिक्षणावर खर्च करत होते अशी माहिती समोर आली आहे.

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार प्रेमळ व मनमोकळ्या स्वभावाचे जेटली कुटुंबाप्रमाणेच कर्मचाऱ्यांचीही काळजी घेत. त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जेटली आग्रही होते. त्यासाठी ते वकिलीतून मिळणाऱ्या फी मधून मिळणारी 10 टक्के रक्कम खर्च करत असे त्यांचे एकेकाळचे राजकीय सचिव असलेल्या ओम प्रकाश शर्मा यांनी सांगितले आहे. तसेच याच कर्मचाऱ्यांची मुले आज डॉक्टर व इंजिनियर झाले असून जेटलींमुळेच मुलांचे भवितव्य घडले अशी भावना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या