हिंदुस्थानी सैन्याचा ‘हिम विजय’ बघून चीन टरकला

1986

हिंदुस्थानी सैन्य अरुणाचल प्रदेशात 14 हजार फुटांवर युद्धाभ्यास करत असल्याने चीनची झोप उडाली आहे. ‘हिम विजय’ असे या युद्धाभ्यासाला नाव देण्यात आले असून या यु्द्धाभ्यासास चीनने विरोध दर्शवला आहे. पूर्वेकडील राज्यात अशा प्रकारे यु्द्धाभ्यास करण्याची ही हिंदुस्थानी सैन्याची पहिलीच वेळ आहे. यामुळे चीन बैचेन झाला आहे.

हिंदु्स्थानी सैन्याचा हा यु्द्धाभ्यास प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर लांब 14 हजार फूट उंचावर सुरू आहे. तीन तुकडया हा यु्द्धाभ्यास करत आहे. प्रत्येक तुकड्यात 4 हजार सैनिक आहेत. 25 ऑक्टोबरला या युद्धाभासाचा समारोप होणार आहे. तवांग जवळ अरुणाचल प्रदेशात अनेक टप्प्यांमध्ये या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे.

चीनचा विरोध

चीन अरुणाचल प्रदेशातील एका मोठ्या भागावर मालकी हक्क सांगत आहे. दक्षिण तिबेटचा तो भाग असल्याचा चीनचा दावा आहे. मात्र हिंदुस्थानने चीनचा हा दावा फेटाळून लावल्याने चीनची तंतरली आहे. त्यातच आता याच भागात हिंदुस्थानी सैन्य यु्द्धाभ्यास करत असल्याने चीन बिथरला आहे. यामुळे या अभ्यासात तो विरोध करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या