स्वदेशी `कोव्हॅक्सीन’ लसीचा पहिला डोस दिला; एम्स रुग्णालयात 30 वर्षीय स्वयंसेवकावर चाचणी

706

हिंदुस्थानातच बनवण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लसीची मानवी चाचणी आजपासून सुरू करण्यात आली. एका 30 वर्षीय स्वयंसेवकाला या लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर त्याला दोन तासांनी घरी पाठवण्यात आले असून पुढील सात दिवस त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीने ही कोव्हॅक्सीन लस बनवली आहे. ती 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. देशातील एकूण 12 ठिकाणी 750 जणांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या