सोशल मीडियात सुरक्षा दले ‘आयएसआय’च्या निशाण्यावर

685

कलम 370 हटवल्यापासून खवळलेल्या पाकिस्तानने आता सोशल मीडियातून हिंदुस्थानविरोधात कुरापती सुरू केल्या आहेत. ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने एका लष्कर अधिकाऱयाचा नंबर पाकिस्तानातील संशयास्पद व्हॉटस्ऍप ग्रुपमध्ये ऍड केला होता. याची गंभीर दखल घेऊन लष्कराने आपल्या अधिकाऱयांना व्हॉटस्ऍप सेटिंग बदलण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानातील 9230332569307 या संशयित मोबाईल नंबरवरून हिंदुस्थानी लष्करातील एका अधिकाऱयाला व्हॉटस्ऍप ग्रुपमध्ये ऍड केले गेले होते. त्यावर संबंधित अधिकाऱयाने स्वतची ओळख देत ग्रुप सोडण्याआधी त्या ग्रुपचा स्क्रीन शॉट घेतला. जर लष्कर अधिकाऱयांनी आपल्या व्हॉटस्ऍप सेटिंग्जमध्ये अनधिकृत आणि अनोळखी ग्रुप्सना ब्लॉक केले असते तर हा पाकिस्तानचा अतिरेक टाळता आला असता असे लष्कराने म्हटले आहे. अधिकाऱयांनी व्हॉटस्ऍप सेटिंग्ज बदलावी, जेणेकरून त्यांचा नंबर अनोळखी व्यक्तीकडून संशयास्पद ग्रुपमध्ये ऍड केला जाणार नाही अशी सतर्कतेची सूचना लष्कराने केली आहे.

‘आयएसआय’च्या गुप्तहेरांचे लष्करी अधिकाऱयांशी चॅटिंग
‘आयएसआय’चे गुप्तहेर गोपनीय आणि संवेदनशील माहितीच्या मागावर आहेत. ते यासाठी हिंदुस्थानी लष्करातील जवान आणि वरिष्ठ अधिकाऱयांसोबत चॅटिंग करतात. अलीकडेच दोघा जवानांना ‘आयएसआय’ने हनी ट्रप केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या