जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचे छापे

555

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने शुक्रवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर छापे टाकले. जेट एअरवेजमध्ये इतिहाद एअरवेजने गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक एफडीआयच्या नियमांची पायमल्ली करून करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यासंदर्भातच ईडीने हे छापासत्र सुरू केले आहे. दरम्यान, याआधी गुरुवारी गंभीर फसवणूक कार्यालयाकडून (एसएफआयओ) गोयल यांची चौकशी करण्यात आली होती.

जेट एअरवेज आर्थिक डबघाईला आल्याने व कर्मचाऱ्यांना पगार देणेही कठीण झाल्याने मार्च महिन्यात गोयल व त्यांच्या पत्नीने राजीनामा दिला होता. त्यानंतर जेटच्या कर्मचाऱ्यांना इतर विमान कंपन्यांनी नोकरीत समाविष्ट केले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या