लालूप्रसाद यांची प्रकृती गंभीर; दिल्लीच्या एम्समध्ये हलवले

lalu prasad yadav

रांचीतील ‘रिम्स’मध्ये उपचार घेत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली आहे. लालू यांच्या फुप्फुसात पाणी झाले असून चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली. लालूप्रसाद यादव यांना शनिवारी संध्याकाळी दिल्लीतील एम्समध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी तेजस्वी यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची रविवारी भेट घेणार आहेत. लालू यांना पुढील उपचारासाठी तत्काळ रांचीच्या रिम्समधून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्याची परवानगी राजेंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या प्रशासनाने तुरुंग प्रशासनाकडे परवानगी मागितली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या