दिल्लीतील नायब राज्यपालांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; 13 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

430

राजधानी नवी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या कार्यालयातील 13 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी सकाळी ही गंभीर बाब उघड झाली. देशातील लॉकडाऊनचा काळ संपला असून अनलॉक 1.0 सुरू झाला आहे. मात्र, या काळात राजधानी दिल्लीसह देशभरात कोरोना संक्रमणाच्या घटना वाढत आहेत. नवी दिल्लीत सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांवर गेला आहे.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनाने राजधानीतील नायब राज्यपालांच्या कार्यालयात शिरकाव करत मोठा धक्का दिला आहे. या कार्यालयातील सुमारे13 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यपालांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीत चार दिवसांपासून दिल्लीतील कोरोना संक्रमणाची आकडेवारी एक हजाराच्या खाली आली आहे. 1 जूनला दिल्लीत 990 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर कोरोनाबाधितांची संख्या 20,834 वर पोहचली आहे. तर एका दिवसात 50 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 523 झाली आहे. राजधानीत कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच नायब राज्यपालाच्य़ा कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या