तारिख पे तारिख ओरडत तरुणाचा कोर्टात राडा

दामिनी चित्रपटात सनी देओलने म्हटलेला कोर्टात म्हटलेला तारिख पे तारिख हा डायलॉग चांगलाच गाजला. हा चित्रपट रिलीज होऊन 28 वर्ष होऊन गेली तरी हा डायलॉग मात्र सर्वांच्या स्मरणात राहिला आहे.

आज हाच डायलॉग म्हणत एका तरुणाने दिल्ली न्यायालयात राडा घातला. न्याय मिळायला उशीर होत असल्याने या तरुणाने न्यायालयात राडा करत कोर्टरुममधले फर्निचर व कॉम्प्युटर तोडले.

राकेश असे त्या तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. राकेशने 2016 साली एका प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून तो न्यायालयाच्या प्रतिक्षेत होता.17 जुलैला त्याच्या खटल्यात सुनावणी होती. मात्र न्यायालयाने पुन्हा पुढची तारिख दिली. न्यायालयाने दिलेली तारिख ही बऱ्याच महिन्यानंतरची असल्याने तो भडकला.

त्यानंतर त्याने थेट न्यायधीशांना जाब विचारला. मात्र त्याला लवकरची तारिख न मिळाल्याने तो भडकला व त्याने न्यायालयातील फर्निचर तोडले व कॉम्प्युटर फोडले. त्यानंतर तो न्यायधीशांच्या चेंबरमध्येही घुसला व तिथेही त्याने तोडफो़ड केली.

आपली प्रतिक्रिया द्या