मनेका गांधींनी शेअर केला 70 वर्षांपूर्वी नेहरुंनी विणलेल्या साडीतला फोटो

47

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सध्या सोशल मीडीयावर हॅशटॅग SareeTwitter चा ट्रेंड सुरू आहे. कॉँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह देशातील अनेक नामवंत महिलांनी साडीतले त्यांचे फोटो शेअर केले. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीदेखील त्यांचा साडीतला एक फोटो टि्वटरर शेअर केला आहे. वरूण गांधी यांच्या लग्नातला हा फोटो आहे. यात मनेका यांनी  गुलाबी साडी नेसलेली आहे.

इंडीयन एक्सप्रेसने हे वृत्त दिले असून यात फोटोच्या खाली मनेका यांनी नमूद केले आहे की मी जी साडी नेसलेली आहे. ती 70 वर्षांपूर्वी पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी विणलेली आहे. मी ही साडी मुलाच्या लग्नात बनारस येथे नेसले होते. माझी सून  यामिनी हिने नेसलेली साडी ही मला माझ्या सासूबाई (इंदिरा गांधी) यांनी यांनी लग्नात दिली होती. मनेका गांधी यांनी शेअर केलेल्या हा फोटोला लाखो जणांनी लाईक केले आहे.

maneka-saree-twitter

काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांनी देखील 22 वर्षांपूर्वींचा लग्नातला फोटो शेअर केला होता. लग्नात पूजेच्या वेळी काढलेला हा फोटो असल्याचे त्यांनी म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या