CAA दिल्ली हिंसाचार: हेड कॉन्स्टेबलसह 3 जणांचा मृत्यू, 37 पोलीस जखमी

604

दिल्लीत नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(NRC)च्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनादरम्यान दगडफेकीच्या घटना घडल्या असून यात एका हेड कॉन्स्टेबलसह दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात 37 पोलीस गंभीर झाल्याचीही माहिती समोर येत आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीतील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या