मेरी कोम माझे प्रेरणास्थान- निखतचे मनोगत

477

माजी विश्वविजेती मेरी कोम माझे प्रेरणास्थान आहे. तिच्याशी ऑलिम्पिक चाचणी लढत खेळणे म्हणजे तिचा अपमान करायचाय असा अर्थ लावून घेऊ नका. मेरी माझ्यासाठी सतत प्रेरणीय आहे आणि भविष्यातही राहील.माझ्या आयडॉलशी बॉक्सिंग रिंगमध्ये खेळण्याच्या भावनेनेच मी आनंदी झाली आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही ,असे मनोगत टोकियो ऑलिम्पिकच्या 51 किलो मुष्टियुद्ध लढतीची पात्रता सिद्ध करण्यासाठी परिश्रम घेणारी 23 वर्षीय स्टार बॉक्सर निखत झरीन हिने व्यक्त केले आहे.

हिंदुस्थानी मुष्टियुद्ध महासंघाने ऑलिम्पिक निवड चाचणी लढतीसाठीची माझी मागणी पूर्ण केल्याने मी आनंदी आहे. बीएफआयचे सरचिटणीस जय कवळीसर आणि केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजूजू यांचे मी खास आभार मानते ,असे सांगून निखत म्हणाली,ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी झटतेय. अर्थात त्यासाठी मला माझीच आयडॉल मेरी कोम हिच्याशी दोन हात करावे लागणार याचे वाईट वाटतेय. पण चाचणी लढतीत मी त्याचा दबाव स्वतःवर मुळीच येऊ देणार नाही.मेरी 2020 ऑलिम्पिकनंतर निवृत्त होणार आहे.मी स्वतः तिचा सल्ला घेऊन तिच्यासारखेच उज्वल यश मिळवण्याचे स्वप्न साकारू शकेन असा मला विश्वास आहे,असेही झरीन शेवटी म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या