नाती काय असतात आणि कशी टिकवायची असतात हे जेटलींनी शिकवले- संजय राऊतांची जेटलींना आदरांजली

905

नवी नाती काय असतात आणि ती कशी टिकवायची असतात हे दिवंगत अरुण जेटलींनी सर्वांना शिकवले. आम्ही त्यांच्याकडून शिकलो. जेटली हे विद्वान नेते होते. त्यांच्या निधनाने देशाचे नुकसान तर झालेच, पण त्याहीपेक्षा अधिक नुकसान शिवसेनेचे झाले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यसभेतील गटनेते खासदार संजय राऊत यांनी जेटलींना आदरांजली वाहिली.

संघर्षाचे दुसरे नाव अरुण जेटली होते. त्यांच्या प्रत्येक संघर्षात आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यांच्या आदेशाने आम्ही वागत असू, नाती काय असतात आणि ती कशी टिकवायची असतात हे अरुण जेटलींनी सगळ्यांनाच दाखवून दिले आहे. त्यांच्या अकाली निधनाने देशाचे तर मोठेच नुकसान झाले आहे. त्याहीपेक्षा शिवसेनेचे अधिक नुकसान झाल्याचे सांगत खा. राऊत यांनी जेटलींना आदरांजली वाहिली.

दोन्ही सभागृहात आदरांजली 

संसद अधिवेशनाच्या पहिल्यात दिवशी दोन्ही सभागृहात दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. अरुण जेटली, सुषमा स्वराज, राम जेठमलानी, गुरुदास दासगुप्ता यांच्यासह इतर सदस्यांना दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेचे विदयमान सदस्य असलेल्या अरूण जेटली आणि राम जेठमलानी यांच्या निधनामुळे राज्यसभेचे कामकाज त्यांच्या सन्मानार्थ दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

श्रीनिवास पाटलांचा शपथविधी 

लोकसभेत पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. साताऱयाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पराभवाची धूळ चारणाऱया श्रीनिवास पाटील यांनीही आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. पाटील यांच्यासह इतरही सदस्यांनी सोमवारी शपथ घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या