पुढची दहा वर्षे हिंदुस्थानचीच!

401

पुढील दशकात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था वेग घेईल असे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

 बिल गेट्स यांनी  सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. तत्काळ काही होईल हे मी सांगू शकत नाही, परंतु पुढची दहा वर्षे हिंदुस्थानची असल्याचे सूचक विधानही त्यांनी अर्थव्यवस्थेबाबत केले. पुढच्या दशकात हिंदुस्थानातील गरिबी दूर होईल आणि सरकारलाही शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी मिळतील, असेही गेट्स म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या