हिंदुस्थानच्या मित्रराष्ट्रांवरही अण्वस्त्र हल्ला करू- इमरानचा मंत्री बरळला

787

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने पुन्हा एकदा हिंदु्स्थानवर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर कश्मीर मुद्दयावर हिंदुस्थानचे समर्थन करणाऱ्या देशांवरही अण्वस्त्र हल्ले करू. त्या देशांना पाकिस्तानचे शत्रू मानले जाईल असेही हा मंत्री बरळला आहे. ‘अली अमीन गंडापूर’ असे या मंत्र्याचे नाव आहे. कश्मीर आणि गिलगिट -बाल्टीस्तानच्या मंत्रीपदाची जबाबदारी गंडापूर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायल हीने एक टि्वट केले आहे. त्यात गंडापूर यांच्या भडकावू भाषणाच्या व्हिडीओचा एक भाग पोस्ट करण्यात आला आहे. त्यात कश्मीर मुद्द्यावरून गंडापूर वादग्रस्त विधान करत असल्याचे दिसत आहे. जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने पाकिस्तान चवताळला आहे. याच मुद्द्यावरुन पाकिस्तानने अनेक देशांकडे समर्थन मागितले. पण हा हिंदु्स्थानचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत एक दोन देश वगळता कोणीही त्यांना पाठिंबा दिला नाही. यामुळे कश्मीर राग आवळणाऱ्या पाकड्यांनी हिंदुस्थानबरोबर द्विपक्षीय संबंध तोडले आहेत. तसेच खान यांच्या मंडळातील मंत्री याच मुद्द्यावरुन वारंवार हिंदुस्थानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या