अर्थसंकल्पीय अधिवेशन 29पासून, राज्यसभा सकाळी; लोकसभा दुपारनंतर

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचे कामकाज दुपारच्या सत्रात होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला
यांनी आज यासंदर्भात माहिती दिली.

राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 2 तर लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9पर्यंत चालणार असल्याची माहितीही ओम बिर्ला यांनी दिली.

खासदारांनी आरटीपीसीआर चाचणी करावी

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी सर्व खासदारांनी आपली आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आवाहनही लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी केले.

संसदेतील कँटीनची सबसिडी बंद

संसदेतील कँटीनमध्ये सर्वात स्वस्त जेवण मिळते, अशा टिप्पण्या आता इतिहासजमा होणार आहेत. संसदेतील कँटीनमधली सगळी सबसिडी बंद करण्याचा निर्णयही लोकसभा सभापतींनी जाहीर केला. मात्र खासदारांसह सुरक्षारक्षक, अधिकारी, पत्रकार मंडळींना जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

आपली प्रतिक्रिया द्या