विमानसेवेचा श्रीगणेशा; तब्बल दोन महिन्यांनी विमान वाहतूक सुरू

1017

अखेर देशातील विमानतळांवर पुन्हा एकदा वर्दळ सुरू झाली असून राजधानी नवी दिल्लीहून पुण्यासह देशातील विविध शहरात विमान वाहतुकीचा श्रीगणेशा झाला. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भुवनेश्वर करता विमानाने उड्डाण केले.

तब्बल 2 महिन्यानंतर देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यावेळी विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर फेस कव्हर मास्क पाहायला मिळाले. विमानातील ‘क्रु मेम्बर’नी पीपीई किट परिधान केले होते. संपूर्ण सुरक्षेत विस्तारा एअरलाइनचा 6 वाजून 50 मिनिटांनी हा प्रवास सुरू झाला. पुणे येथे उड्डाण झालेल्या विमानाची अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. तर अहमदाबाद येथून 7:45 मिनिटांनी पहिले विमान दाखल होईल.

आपली प्रतिक्रिया द्या