पंतप्रधान मोदींनी घेतला Covaxin चा दुसरा डोस, म्हणाले कोरोनाविरुद्ध लढण्याचा एक पर्याय

modi-vaccination

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाविरोधी लसीचा दुसरा डोस घेतला. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘मी आज दिल्ली एम्समध्ये लसीचा दुसरा डोस घेतला.’ यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी या टप्प्यात पात्र असलेल्या सर्वांनी लसीचा डोस घ्या अशी विनंती करताना, लसीकरण करून घेणे हा व्हायरसला पराभूत करण्याच्या काही पर्यायांपैकी एक पर्याय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनाविरोधी लस ‘कोव्हॅक्सीन’चा दुसरा डोस मुळच्या पंजाबच्या असलेल्या नर्स निशा शर्मा यांनी दिली. त्यांच्यासोबत पुडुचेरीच्या सिस्टर पी निवेदा उपस्थित होत्या. पीएम मोदी यांना जेव्हा कोरोनाविरोधी लसीचा पहला डोस दिला होता, तेव्हा देखील पी निवेदा उपस्थित होत्या. सिस्टर निवेदा म्हणाल्या की मला दुसऱ्यांदा पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली. छान वाटलं, आम्ही सोबत फोटो देखील घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या