जुने व्हिडीओ व्हायरल करून कश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याचा डाव

730

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये हिंसाचार भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र तेथील परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. मात्र हीच शांतता काहीजणांना नको असून त्यांनी 2010 आणि 2016 सालचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत कश्मीरमधील शांतता भंग करण्याचा उद्योग सुरू केला आहे. जम्मू-कश्मीरचे अतिरिक्त पोलीस संचालक मुनीर खान यांनी ही माहिती दिली आहे.

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कश्मीरमधील सद्यपरिस्थिती या विषयावर आधारित पत्रकार परिषदेत बोलताना खान यांनी कश्मीर खोऱ्यात जुने व्हिडीओ व्हायरल केले जात असल्याचे सांगितले. तसेच हे व्हिडीओ आताचे असल्याचे सांगितले जात आहेत. यावर आमचे लक्ष असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस मुख्य सचिव रोहित कंसल देखील उपस्थित होते. तसेच सध्या आमचे लक्ष 15 ऑगस्टवर असून कश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिन शांततेत पार पडावा यासाठी प्रशासन पूर्ण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जम्मूमध्ये काही ठिकाणी लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले असून शाळा कॉलेज सुरू करण्यात आले आहेत. तसेच जम्मू-कश्मीरमध्ये काही ठिकाणी निर्बंध अजूनही कायम ठेवण्यात आले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. कश्मीरमध्ये काही ठिकाणी पॅलेट गनचा वापर करण्यात आला. ज्यात काहीजण जखमी झाल्याची माहिती खान यांनी यावेळी दिली. तसेच कलम 144 हटवण्याबद्दल त्यांना विचारल्यावर त्यांनी तो निर्णय सर्वस्वी जिल्ह्यंच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना घ्यायचा आहे असे स्पष्ट केले.

तसेच अनेकजणांना अटक करण्यात आली आहे. तर काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काहीजणांचे जबाब नोंदवण्यात येत असल्याचे खान यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यात कलम 144 लागू झाल्यानंतरही 370 कलम हटवण्यास विरोध दर्शवण्यासाठी हजारोंच्या संख्येने कश्मीरी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

Muneer Khan: There have been localised incidents in various parts of Srinagar & other districts, which have been contained.There have been no major injuries. There have been a few pellet injuries, they were treated. Our biggest endeavor is that no civil casualty should take place pic.twitter.com/KIAEs0gigG

आपली प्रतिक्रिया द्या