इसिसच्या तीन दहशतवाद्यांना दिल्लीतून अटक

482

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसिसच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्या तिघांना वजीराबाद येथून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. सध्या त्या तिघांची कसून चौकशी केली जात आहे.

26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दिल्लीत वजिराबाद येथे काही दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना दिली होती. त्यानंतर या पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत दहशतवाद्यांना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या